सावली (सुधाकर दुधे)
सावली पंचायत समिती अंतर्गत सोनापुरच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ३सप्टेंबर२०२२ रोजी शनिवार ला माता पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री.श्रीधर तुळशिराम सोनुले तर उपाध्यक्षपदी सौ.निकीता निलकंठ गेडाम यांची एकमताने निवड करण्यात आली.सदस्य म्हणून कुंदा रंगनाथ भोयर, गजानन भैय्याजी भंडारे, रंजना डोमाजी मेश्राम, विजय भाऊराव भोयर , संतोष अशोक क्षीरसागर नितेश सदाशिव भुरसे , मनिषा प्रमोद भांडेकर , नितीन डोमाजी भांडेकर , वंदना संदीप चलाख, कुसुम मनोज इटकलवार यांची निवड करण्यात आली.