ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी : आर्थिकदृष्ट्या मागास व गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत आरमोरी येथील डॉ . आंबेडकर विद्यालयाचे सहा विद्यार्थी यशस्वी ठरले . त्यांना वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे . आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना शासनाकडून वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते . सदर शिष्यवृत्ती परीक्षेत डॉ . आंबेडकर विद्यालयाने याही वर्षी २०२१-२२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले . शाळेतील सहायक शिक्षक डी . डब्ल्यू. बावनवाडे यांनी अतिरिक्त वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करून दिली . त्यामुळे अखिया राजेश खोब्रागडे , स्विटी मनोज दामले , कल्याणी रामदास निखारे , रोहित कुमार शेंडे , वेदांत पुरंदर बरडे , अनुश गोवर्धन चौके आदी सहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करीत ते शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले . विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आईवडील , मुख्याध्यापक , शिक्षक आदींना दिले . यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदन मेश्राम , सचिव अॅड . प्रशांत मेश्राम , मुख्याध्यापक व्ही . जी . शेंडे , मार्गदर्शक शिक्षक डी . डब्ल्यू बावनवाडे यांनी कौतुक केले .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News