छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
श्री. साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथील पर्यवेक्षक एल. ए. वैरागडे सर यांना सेवानिवृत्तीपर सपत्नीक निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक श्री. डी. व्ही. आकरे सर ,प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव पी .आर. आकरे सर, कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य जिभकाटे सर, राजूभाऊ आकरे वडसा, लोथे सर, कु. आकरे मॅडम उपस्थित होते.श्री वैरागडे सर यांची एकूण सेवा 31 वर्षाची झाली त्यापैकी 28 वर्ष श्री तुकाराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कढोली तर तीन वर्ष श्री साईनाथ विद्यालय मालेवाडा येथे त्यांनी घालवली. आपल्या बुलंद आवाजाने विद्यार्थ्याचे मन ते आपल्याकडे वळवून घेत असत तसेच अत्यंत सुस्वाभावी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे ते आवडते शिक्षक होते. वैरागडे सरांनी आपल्या भाषणातून सांगितले की हा जीवन प्रवास अविस्मरणीय राहील व आपल्याला सुद्धा शाळा व विद्यार्थ्यांची कमतरता जाणवणार.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अवचट सर, निकुरे सर, निंंबेकर सर, करमरकर सर, लांडगे सर, नैताम सर ,वैद्य सर, वाघे सर, साळवे सर, खोब्रागडे सर, बोडणे सर, देशमुख बाबूसाहेब, श्री वटी, राहुल चौबे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. नवखरे मॅडम तर आभार निंबेकर सर यांनी व्यक्त केले.