आरमोरी शहरातील मुख्य रस्त्यावरील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा… — आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे मुख्याधिकारी यांना निवेदन…

प्रितम जनबंधु

     संपादक 

आरमोरी – गडचिरोली नागपूर राज्य महामार्गावर आरमोरी शहरातील मुख्य रस्त्याच्या अगदीच मध्यभागी रोडवर बसून राहनाऱ्या मोकाट जनावरांचा नगरपरिषदेने तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नगरपरिषद आरमोरी येथील मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

      त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी शहरातील मुख्य मार्ग गडचिरोली- नागपूर या रोडवर (जुना बस स्टॅन्ड ते जीवानी राईस मिल) नेहमी मोकाट जनावरांचा वावर असतो, नेहमी या मुख्य मार्गावर मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी बसलेले असतात, रात्रीसुद्धा ते बसलेले असतात. दिवस-रात्री असे मुख्यमार्गावर बसत असल्याने रहदारीस नेहमी अडथळा निर्माण होत असतो.

            एवढेच नाहीतर रस्त्यावरील या मोकाट जनावरांमुळे अनेकदा छोटे मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे वीनाकारण निरपराध जनतेला प्रसंगी आपला जीवही गमवावा लागू शकतो. याबाबत आपल्या कार्यालयाला वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अशा अपघातातून जर जीवित हानी अथवा वित्त हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार नगरपरिषद प्रशासनाला ठरवल्या जाईल.

         तद्वतच येत्या एका आठवड्यात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला नाही, तर मात्र रोडवरील मोकाट जनावरे जमा करून आपल्या नगरपरिषद कार्यालय परिसरात बांधून ठेवण्यात येतील. असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

           मुख्याधिकारी यांना निवेदन देतेवेळी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, शहर अध्यक्ष शालिक पत्रे, उपाध्यक्ष विजय सुपारे, NSUI जिल्हा अध्यक्ष निशांत वनमाळी, उपाध्यक्ष मोहित राऊत, अनिल किरमे, दिवाकर पोटफोडे, रवी डोकरे, विनोद कुंभारे, मनोज बोरकर, रुपेश जवंजालकर, दादाजी मने तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.