रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमुर : – चिमूर शहर रोटरी क्लब सन २४-२५ चा पदग्रहण सोहळा श्रीहरी बालाजी देवस्थान येथे संपन्न झाला असून यावेळी रोटरी क्लब चंद्रपूरचे डॉ.विजय आईनचवार उपस्थित होते.
मंचावर मुकुंद मुंडदा, मुरली लाहोटी तर वैभव लांडगे विनोद भोयर उपस्थित होते. रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी विशाल गंपावार तर सचिव पदी कैलास धनोरे यांची निवड करण्यात आली. दरम्यान वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी पदग्रहण कार्यक्रमास सुभाष केमये, श्रेयस लाखे, मंगेश हिंगणकर, प्रफुल बेतावार, राकेश बघेल, हरीश सारडा, कुसाब रोकडे, डॉ. महेश खानेकर, पवन ताकसांडे, पवन बंडे, विलास अल्लडवार, श्याम बंग, संगमवार, दिनेश कठाने, गणेश शास्त्रकार आदी रोटरी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.