पोलीस स्टेशन कुरखेडा यांच्या वतीने शहरात शांतता रॅलीचे आयोजन…

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

           जिल्हा पोलीस प्रशासनाचा उपक्रमा अंतर्गत दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस स्टेशन कुरखेडा यांच्या वतीने दिनांक ०२/०८/२०२४ रोज शुक्रवार रोजी दूपारी ३ वाजता शहरात माओवाद विरोधी शांतता रॅलीचे आयोजन कुरखेडा पोलिस स्टेशन चे ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते.

                या शांतता रॅलीची सुरुवात श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथून करण्यात आली. रेली बाजारपेठ ते पंचायत समिती मार्गे पोलीस स्टेशन कुरखेडा येथे पोहचत समारोप करण्यात आली.

           यावेळी श्रीराम शाळेचे संस्था कोषाध्यक्ष वामनराव फाये, ठाणेदार महेंद्र वाघ, प्राचार्य नागेश्वर फाये, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, प्रा.प्रदीप पाटणकर, प्रा.विनोद नागपूरकर, प्रा.ज्ञानेश्वर देशमुख, प्रा.सत्यम फटिंग, नंदिनी कोटांगले, अपूर्वा बाबोळे व पोलीस अधिकारी व अमलदार मोठ्या संख्येत उपस्थित होते..

या शांतता रॅलीमध्ये श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.