युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- ग्राम पंचायत खल्लार अंतर्गत येणाऱ्या लांडी येथिल बुध्द विहाराचे सौदर्यीकरण व स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी गावातील नागरिकांनी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
लांडी येथिल बुध्द विहार हे नादुरुस्त असल्याने या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम करतांना अडचणीचा सामना करावा लागतो.
तसेच गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. पावसाळ्याच्या दिवसात तर स्मशानभूमीत येण्याजाण्यासाठी रस्त्याअभावी नागरिकांना खुप मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते.
या दोन्ही बाबी लक्षात घेता खासदार बळवंत वानखडे यांनी त्यांच्या खासदार निधीमधून सौदर्यीकरणं स्मशानभूमीचा रस्ता करावा अश्या मागणीचे निवेदन खल्लारचे माजी सरपंच योगेश अरुणराव मोपारी यांच्यासह गावातील गजानन इंगळे, मनिष इंगळे, विनोद इंगळे, योगेश इंगळे,रोहन इंगळे, रामचंद्र इंगळे, मंगेश इंगळे, आबाराव इंगळे,अजय थोरात,अनिकेत नाईक, आकाश इंगळे,श्रीकृष्ण इंगळे, नितेश तायडे,राहुल इंगळे, दुर्गेश इंगळे, रुपेश इंगळे, आशिष आठवले व इतर गावकऱ्यांनी केली आहे.
याचवेळी सर्वप्रथम खासदार बळवंत वानखडे यांचे लांडी गावाच्या वतीने गावकऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.