नवेगाव खैरी,पेच काॅलोनी अंतर्गत शिव मंदीराजवळ वाघाच्या हल्ल्यात गाय ठार.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- नवेगाव खैरी पेच काॅलोनीतील शिवमंदिर जवळ वाघाने गायीवर हल्ला करून ठार केले असल्याची घटना घडली.

        पशुमालक सुर्यकांत पिंपरीकर रा.नवेगाव खैरी,पेंच काॅलोनी शिवमंदिर जवळ यांची दुधारू गाय चरत असताना आज शनिवार सकाळी ११.०० वाजताच्या दरम्यान वाघाने मागुन हल्ला केला.या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला.

         या क्षेत्रात मागील अनेक दिवसापासुन वाघ फिरत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.पारशिवनी वनपरिक्षेत्र हद्दीतील खैरी नवेगाव, माहुली,बच्छेरा,चारगाव,बिटोली आवडेघाट,तामसवाडी,भागीमहारी सह अनेक गावात व शेतात वाघाची दहशत असल्याने शेतकरी व मजुर शेतात जात नाही.

       आज शनिवार सकाळी नवेगाव खैरी गावातील पेच काॅलोनीतील शिवमंदिर जवळ आज सकाळी ११.०० वाजताच्या वाघ हल्ला प्रकरणाची घटना घडली.

         पशुमालक सुर्यकांत पिपरीकर यानी वनविभागाचे वनरक्षक यांना घटनेची माहिती दिली.वनरक्षक यांनी आपले वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली व मृत गायीचा पंचनामा केला.

       पशुमालक,गावातील शेतकरी व नागरिकांनी दुधारू गायीची नुकसान भरपाई द्यावी,वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.