रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळ व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची 12४ वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड होते. त्यांनी आपल्या भाषणात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या क्रांतिकार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास विभाग प्रमुख डॉ प्रफुल राजुरवाडे होते.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या क्रांतीकार्याचा संपूर्ण पट मांडला. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन शारिरिक शिक्षण विभाग व क्रिडा संचालक डॉ उदय मेंडूलकर यांनी केले.
आभार प्रा.आशुतोष पोपटे यांनी केले. या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग घेतला.