ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : तालुक्यातील महालगाव येथील शामानंद हायस्कूल येथे शालेय मंत्रिमंडळ लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली.
यात सारंग शहारे, संजना तरोने, याचना लांजेवार,भावेश चुटे,लुपेश भेडारकर,आचल मारवाडे, कल्यांनी मेंढे,हिमांशू बावणे, रितू मेंढे,रावी ब्राम्हणकर, हिमानी कावळे ,कुणाल पातोडे सानिया भराडे,अक्षरा चुटे विजयी झाले.
निवडणूक अधिकारी म्हणून शाळेतील शिक्षक लांजेवार सर,रामटेके सर, मांडळकर सर,बनकर सर, भुते मॅडम यांनी काम पाहिले असून मुख्याध्यापक के.डी. लांजेवार यांनी नियुक्त झालेल्या मंत्रिमंडळातील सर्वांना त्यांना करावयाच्या कार्याबद्दल माहिती दिली.तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वृद्ध यांनी सहकार्य केले.