वराडा येथे अवैध दारूची विक्री करणाऱ्या आरोपी विरूद्ध कारवाई..

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- बबन धोटे हा आपल्या झोपडीत अवैधरित्या दारु विकत असल्याने गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला मुद्देमालासह अटक करून गुन्हा दाखल केला.

      दिनांक ०१/०८/२०२४ रोजी पोस्टे कन्हान येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की,मौजा वराडा वार्ड क्र. ०१ येथे राहणारा बबन धोटे हा आपले राहते घराचे बाजूला असलेल्या झोपड्यात देशी दारू बाळगुन विक्री करीत आहे.

          अशा माहिती वरून रेड कारवाई करून आरोपी नामे बबन गुलाबराव धोटे, वय ६५ वर्ष, रा. वराडा वार्ड क्र. ०१ याचे घराची दारूबाबत घर झडती घेतली असता घराला लागुन असलेल्या झोपडीची पाहणी केली असता झोपडीत एका प्लास्टिक खुर्चीवर काळ्या रंगाच्या कापडी पिशवीत १८ निपा देशी दारू भिंगरी संत्रा नं. १ च्या सिल १८० एम. एल. च्या प्रत्येकी किंमती ७०/- रू. प्रमाणे १२६०/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध अप क्र.४८०/२४ अन्वये कलम ६५ ई.म.दारुबंदी कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आली.

       सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री.हर्ष ए. पोद्दार (भापोसे),अपर पोलीस अधीक्षक श्री.रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे कन्हान येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश पाटील,पोहवा सचिन वेळेकर यांनी पार पाडली.पुढील तपास पो हवा सचिन वेळेकर हे करित आहे.