युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
बाभळी येथिल नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय देण्यात याबाबतचे निवेदन दर्यापूर तहसिलदार यांना (3)जुनला दर्यापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आतिष शिरभाते यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
बाभळी येथील तलाठी कार्यालय हे साईनगर येथे असून ते कार्यालय बाभळीकरांना लांब पडत आहे. विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, अपंग नागरिकांना, दैनंदिन जीवनातील आवश्यक असलेली दस्तऐवज व कागदपत्रे आवश्यकता भासल्यास थेट साईनगर येथे धाव घ्यावी लागते.
त्यामुळे येण्या जाण्याची दमछाक वेळेचा अपव्यय हा होत असल्याने बाभळी मधील नागरिकांनी आज तहसीलदार यांना निवेदन दिले तरी वरील निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने बाभळी मधील नागरिकांच्या सोयीस्कर सेवेसाठी कार्यालय बाभळी मध्ये उपलब्ध करून द्यावे असे यावेळी तहसीलदार यांना सांगण्यात आले.
निवेदन देतेवेळी आतिश शिरभाते, असलम भाई घाणीवाले,अजय ब्रदिया (वसु) वसीम भाई, सय्यद नदिन, यश गोलाईत, सागर काळे, जमीर खान, शेख आरिफ, प्रतीक कापसे, वैभव मालखेडे , जॉटी जयसिंगपूरे, गजानन गावंडे, प्रदीप सोनवणे ,इंद्रजीत देशमुख, जयेश ऊटाळे ,सह काँग्रेस पक्षाचे पदाधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
त्यासह दर्यापूर शहरात होत असलेली राखेची वाहतूक ही झाकून व्हावी जेणेकरून राखेमुळे नागरिकांच्या डोळ्याला इजा होणार नाही ही खबरदारी म्हणून उपाय सांगितले