युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
जि.प.प्राथमिक शाळा हरतोटी पंचायत समिती भातकुली जिल्हा अमरावती येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. ज्यामध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते पुस्तक वाटप सर्व वर्गांना करण्यात आले.
यामध्ये गावामध्ये उत्सवात रॅली काढून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तसेच सदस्यांसह व पालकांसह मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शालेय पोषण आहारामध्ये गोड पदार्थ देण्यात आले.
सर्व पालक व व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. ज्यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास दंदे उपाध्यक्षा सौ पुष्पाताई दंदे तसेच ज्ञानेश्वर काळे यांचा कार्यक्रमात सक्रिय सहभागी होता. शाळेतील शिक्षक ईशान जाधव शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर पवार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची यशस्विता पार पाडली.