गट ग्राम पंचायत धानोरा पूर्णा द्वारा आयोजित विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा संपन्न..

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

          गट ग्राम पंचायत धानोरा पूर्णा द्वारा आयोजित विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भव्य तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा दिनांक १३/०४/२०२३रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.स्पर्धेत आयोजकांनी एकंदरीत 5 विषय ठेवले होते त्यातील कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करून अनेक विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन पर बक्षीस पटकावली.यामध्ये तीन मोठे बक्षीस होते.

प्रथम बक्षीस १०००१रुपयाचे कुमारी शामली तंतरपाळे कृष्णापुर हिने पटकावले.

तर द्वितीय बक्षीस अपंग महिला कुमारी मृणाली सुनील वानखडे,सर्फाबाद हिने पटकावले ५००१ रोख तसेच तृतीय बक्षीस कुमारी आराध्या गजानन ठाकरे, चांदूरबाजार ३००१ रोख अशा प्रकारची बक्षीस विजेत्या विद्यार्थ्याना रोख रक्कम,चषक,सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.बक्षीस समारंभप्रसंगी आदरणीय आमदार बच्चुभाऊ कडू, संतोष राऊत सर, गोपाल भालेराव,प्रकाश राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेचे निरीक्षण आदरणीय जगदीश पारीसे सर,मिलिंद तायडे सर,सचिन शंकरपाळे सर यांनी केले तर सूत्र संचालन स्पर्धेचे आयोजक तथा संकल्पक मधुसूदन ए. पारीसे यांनी केले, प्रस्तविकाच्या माध्यमातून स्पर्धेचा आढावा घेऊन मिलिंद तायडे सरांनी रूपरेषा मांडली.आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सुमित चऱ्हाटे यांनी केले.

स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल कार्यक्रमाच्या आयोजकांनी सर्व स्पर्धकांचे व त्यांच्या पालकांचे व समस्त गावकरी नागरिकांचे आभार व्यक्त केले.