पारशिवनी : – १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत ग्रा पं कान्द्री व्दारे ग्रामस्थाच्या सेवेकरिता तीन कचरा गाडी, एक ट्रॅक्टर, एक पाणी टँकर व स्वर्गरथ विकत आणुन या सर्व गाड्यांची विधिवत पुजा अर्चना करून जि प अध्यक्ष व सभापती चा हस्ते हिरवी झेंडी दाखवुन लोकार्पण सोहळा थाटात साजरा करण्यात आला. 

          ग्रा.पं. कान्द्री येथे गावकऱ्यांच्या सेवेसाठी १४ वा वित्त आयोग निधी अंतर्गत तीन कचरा गाडी, एक ट्रॅक्टर, एक पाणी टँकर व स्वर्गरथ विकत आणुन या सर्व गाड्यांची विधिवत पुजा अर्चना सौ. रश्मीताई बर्वे अध्यक्षा जि. प.नागपुर श्री. बलवंतजी पडोळे सरपंच ग्रा. पं. कान्द्री, सौ मिनाताई कावळे सभापती पंचायत समिती पारशिवनी यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवुन गाव कऱ्यांचा सेवेकरिता लोकार्पण करित सर्व गाड्या सुरू करण्यात आल्या. याप्रसंगी श्यामकुमार बर्वे उपसरपंच , ग्रा.पं. सदस्य धनराज कारेमोरे, ग्रा प सदस्य बैसाखु जनबंधु, ग्रा पं. सदस्य प्रकाश चाफले, ग्रा पं सदस्य शिवाजी चकोले, ग्राम पंचायत चंद्रशेखर बावनकुळे, ग्रा प महेश झोडावणे, राहुल टेकाम ग्रा.पं. सदस्या आशाताई कनोजे, दुर्गाताई सरोदे, सिंधुताई वाघ मारे, रेखाताई शिंगणे, अरूणा हजारे, विभा पोटभरे, मोनाली वरले, वर्षा खडसे, अरूणा पोहरकर, ग्राम विकास अधिकारी दिनकर इंगळे तसेच ग्रा.पं चे समस्त कर्मचारी वृंद व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com