पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
देसाईगंज – शहरात कोरोनापुर्व काळापासून लाभलेले संवर्ग विकास अधिकारी श्रावण सलाम हे नुकतेच दि. ३० जुन २०२२ ला नियमीत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमीत्याने पंचायत समिती देसाईगंज येथील निवासस्थानी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रेस क्लब सदस्यांकडून त्यांचे सपत्नीक शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
सलाम यांनी देसाईगंज पंचायत समितीचा कार्यभार सांभाळून तालुक्याचा कायापलट केला. त्यांनी सामान्य, गोर-गरीब नागरिकांच्या समस्यांचे स्वत: आपल्या स्तरावरून निराकरण केले. शांत, संयमी स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी स्वतः पंचायत समिती परिसरात केर-कचरा स्वच्छ व सुंदर परिसर ठेवण्याची इतरांना प्रेरणा दिली. याची दखल घेत प्रेस क्लब सदस्यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
यावेळी प्रेसक्बल अध्यक्ष प्रभातकुमार दुबे, उपाध्यक्ष विलास ढोरे, सचिव राजरतन मेश्राम, जेष्ठ पत्रकार शा. मो. बारई, प्रा. दयाराम फटींग, प्रकाश दुबे, राहुल मेश्राम, घनश्याम कोकोडे, पंकज चहांदे आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते.