वणी : परशुराम पोटे
तालुक्यातील मौजा बाबापूर येथील एका इसमाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
विनोद नानजी खुटेमाटे( ४२) असे मृतकाचे नाव आहे.
विनोद ने आज दिनांक ३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास विषारी औषध प्राशन केल्याने त्याला वणी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.
मृत व्यक्तीचे वडिल नानाजी शंकर खुटेमाटे यांचे नावे मौजा बाबापूर येथे गट क्रमांक 18,150,50 एकुण क्षेत्र 3:33 हे. आर व मौजा चेंडकापूर येथे 10/1 क्षेत्र 2.63 हे. आर या वर्णनाची शेती आहे.
मृतकाचे पश्चात पत्नी सुनिता विनोद खुटेमाटे, मुलगी स्वाती विनोद खुटेमाटे(१८), मुलगा हर्षल विनोद खुटेमाटे(१६), वडील नानाजी शंकर खुटेमाटे, आई सिंधु नानाजी खुटेमाटे असा आप्त परिवार आहे. घरचा कर्ता पुरुष निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विनोद ने विष प्राशन करून आत्महत्या का केली? याचे कारण कळु शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.