वणी : परशुराम पोटे
मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांचा वाढदिवस शहरातील मोमीनपुरा येथे भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला आहे.
मोमीनपुऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय नेत्याचा वाढदिवस भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. राजु उंबरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वणी- मारेगाव व झरी येथे पक्ष प्रवेश व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.