नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
लाखनी : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य कडून इतर इमारत बांधकाम कामगार मजूरांना 02 जुलै लाखनीत स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.
कामगारांना त्यांच्या 29 कल्याणकारी योजनेंचा पुरेपूर लाभ मिळावा व त्यांची विशिष्ट स्मार्ट कार्डद्वारा एक विशेष ओळख क्रमांक मिळावा याकरीता लाखनीत कामगारांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सौ.डॉ. निंबार्ते, जिल्हा परिषद सदस्या सौ कुंभरे, महिला बालकल्याण अध्यक्ष सौ. स्वाती वाघाये अँड शफी लद्धानी, राजू निर्वाण लाखनी अध्यक्ष काँग्रेस कमिटी हे मंचावर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात भंडारा जिल्हा असंघटीत कामगार अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कामगार कल्याणकारी मंडळ प्रतिनिधी मार्कंडराव भेंडारकर यांनी सांगितले की कामगारांच्या हितासाठी बरेचश्या योजना असून प्रत्येक कामगार महिला व पुरूषांनी आपली नोंदणी करून पेटी फार्मचा लाभ जास्तीत जास्त घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास स्मार्ट कार्ड वितरण प्रसंगी शिवराय नेट कैफे लाखनी संचालक दिनाक्षी तिरपूडे, साकोली संचालक व पत्रकार कार्यालय ऑपरेटर आदित्य चेडगे व त्यांच्या चमुने अथक परिश्रम घेतले.