आदर्श आचारसंहीतेचे पालन करा :- पो.नि.राजेश थोरात…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी:-पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांच्या कडून पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शहर व ग्रामीण हद्दीतील सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात आले की,लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 10 मार्च 2024 पासून ते दिनांक 6 जुन 2024 पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून नागपूर ग्रामीण सह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल दिनांक 4 जुन 2024 ला जाहीर करण्यात येणार आहे.

         त्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे,फेसबुक,इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या,जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील, अशा स्वरूपाच्या पोस्ट,कॉमेंट्स, स्टोरी,स्टेटस,डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत. 

       तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करणार नाहीत,डीजे वाजवणार नाहीत.तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये.

        व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 3 जुन 2024 ते दिनांक 6 जुन 2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only admin करून बदल करून घ्यावा,जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत. 

       जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी ग्रुप सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश थोरात आणि सहायक पो.नि.वैरागडे यांनी केले आहे.