अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखा आरमोरीच्या वतीने मौजा कोजबी येथे ग्राम शाखा गठीत करण्यात आली.
यावेळी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष राजेश लिंगायत, सचिव जयद्रथ बोदेले , कार्याध्यक्ष सिद्धार्थ घुटके यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात कोजबी येथील ग्राम शाखा गठित करण्यात आली.
यावेळी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे तालुकाध्यक्ष श्री राजेश लिंगायत यांनी उपस्थितांना बुद्ध व त्यांचा धम्म व धम्माचा प्रचार आणि प्रसार याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ग्राम शाखा कोजबी येथील अध्यक्ष म्हणून श्री. ईश्वर मेश्राम ,उपाध्यक्ष म्हणून श्री. भगवान मोहिते, सचिव चंद्रदत्त माटे, डोमाजी शंभरकर, सदस्य केशवराव चहांदे, जयद्रथ गणूजी बोदेले , तर प्रसिद्धीप्रमुख अश्विन बोदेले, संघटक मदन चहांदे, सिताराम बोदेले, उद्धव लोखंडे, गिरीधर शेंडे,
महिला सदस्य शहकला सिताराम बोदेले, सहसचिव सुमन ब्रह्मदास मेंढे, शारदा शंभरकर, भामिना राहाटे, भाविका बनकर ई. निवड करण्यात आली. यावेळी कोजबी येथील समाज बांधव उपस्थित होते.