संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
लोकसभा निवडणूक म्हणजे या देशातील लोकशाहीचे आणि देशातील नागरिकांचे भविष्य होय.उद्याला मतमोजणी अंतर्गत ५४३ लोकसभा मतदारसंघातील,”ईव्हिएम मशीनी,काय चित्र पुढे आणतात यावरुन लोकशाहीचे चित्र उमजेल आणि देशातील नागरिकांचे भविष्य पुढे येईल!..
लोकसभा निवडणूक प्रक्रियातंर्गत वाटचाल करीत असतांना या देशातील नागरिक व मतदार,पक्ष प्रमुख,पक्ष पदाधिकारी,पक्ष कार्यकर्ता विश्वसनिय आणि अविश्वसनीय कर्तव्यातून निवडणुकीला सामोरे जात होते हे प्रामुख्याने लक्षात येत होते.
भारतीय संविधानाचे रक्षण करणे म्हणजे देशातील नागरिकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे होय.
राष्ट्रीय काॅग्रेस पक्ष व त्यांच्या मित्र पक्षांची प्रचार यंत्रणा अतिशय प्रभावी व परिणामकारक आणि देशातील नागरिकांच्या दृष्टीकोनातून तितकीच संवेदनशील होती,हे प्रकर्षाने जाणवत होते.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे,माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी,महासचिव प्रियंका गांधी,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे,महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधीपक्षनेते ना.विजय वडेट्टीवार,शिवसेना खासदार संजय राऊत,शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे,आप पक्षप्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग,बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव,उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि इतरांनी सांभाळलेली लोकसभेची प्रचार यंत्रणा मतदारांची मने व मते परिवर्तन करणारी ठरली.
तद्वतच राजकीय विश्लेषकांच्या मनात अनेक तर्कवितर्कांसह पक्ष चौपट होण्याची भिती असताना,”बहुजन समाज पक्ष प्रमुख बहन कुमारी मायावती आणि वंचितचे सर्वेसर्वा अँड प्रकाश आंबेडकर यांनी स्वबलावर लोकसभा निवडणूक लढण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्यातील भविष्य वास्तव्याचा आत्मविश्वास होता हे विसरून चालणार नाही.
देशपातळीवर बसपाचे आणि महाराष्ट्र राज्यात वंचितचे किती खासदार निवडून येतात हे उद्या स्पष्ट होईल.पण,ईव्हिएम मशीनच्या,”फ्रि अँड फेयर, मायाजाळात भष्म होण्याची शक्यता असताना स्वत:च्या विचारसरणीला व स्वत:च्या भुमिकांना महत्व देत एकला चलो निती अंतर्गत लोकसभा निवडणूकीला सामोरे जाणे म्हणजे या दोन्ही पक्ष प्रमुखांचा दमखमच म्हणावे लागेल.
नागरिक म्हणजे देश असला तरी,या देशातील नागरिक समजदार,सतर्क,जागरुक आहेत काय?याचे परिक्षण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत.या निवडणूकांतून मतदारांचे अनेक विचार व दृष्टीकोन समोर येतात आणि त्यांच्या भुमिकाही कळतात.
काही राजकीय नेत्यांची निच्च स्तरावरील भाषा बघता सध्यास्थित देश अतिशय नाजूक परिस्थितीतून वाटचाल करीत आहे.
याचबरोबर देशात राजकीय,सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,न्यायीक विषमतेचा सारिपाट मजबूत होत असल्याने या देशातील नागरिकांचे भविष्य सुरक्षित आहे असे म्हणता येणार नाही.
पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचार यंत्रणा बघितली तर ते या देशातील नागरिकांना अवास्तव,अयोग्य व खालच्या स्तरावरील शब्दातंर्गत वारंवार भिती दाखवत होते आणि भिती अन्वये स्वपक्षाला मते मागत होते हे प्रामुख्याने निदर्शनास आले.प्रधानमंत्री सारखे व्यक्तीत्व देशातील मतदारांना भिती दाखवून पक्षाला मते मागतात, यासारखी लाजीरवाणी घटना देशातील इतिहासात दुसरी असूच शकत नाही.
तद्वतच त्यांनी देशातील विविध पक्षातील विरोधी पक्षनेत्यांना देशद्रोही,अन्टी अर्बन नक्षल,भ्रष्टाचारी संबोधने हे देश सुरक्षासंबंधाने कितपत योग्य होते आणि आहे? एखादा नेता भ्रष्टाचारी असेल तर न्यायव्यवस्था बघेल ना!,”त्यांचे काय करायचे?
मात्र,लोकसभा निवडणूक दरम्यान विरोधी पक्षनेत्यांवर कटाक्ष करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दस्तुरखुद्द न्यायाधीश बनत होते हे न पटणारे व न पचणारेच होते.विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अयोग्य भाषातंर्गत अमर्याद शब्दांचा वारंवार वार करून सर्वोत्तम लोकशाहीला व उत्तम राजकीय व्यवस्थेला जिवंत ठेवता येत नाही हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्या भाषेत सांगतील?हा प्रश्न निरुत्तर असेल..मात्र त्यांच्या अयोग्य भाषेची इतिहासात नोंद घेतली जाईल एवढे निश्चित!
उद्या म्हणजे ४ जूनला लोकसभा निवडणूक अंतर्गत देशभरात मतमोजणी होणार आहे.कोणाचे भविष्य झळकून निघेल हे कळेलच…