प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन..

 

प्रितम जनबंधु

संपादक 

       लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना गुरूवार दिनांक ८ जून,२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृह एस टी स्टँडच्या पाठीमागे लातूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहेत. तसेच संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

      या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मॅक्स महाराष्ट्रचे ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड अमोल सकट, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, दैनिक पुढारीचे पत्रकार नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे असणार आहेत.

       याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, म. फुले महाविद्याय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, पंकज वानखेडे, अजय सुर्यवंशी, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील संपादक, पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहवे असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, ओमकार टाले व सर्व तालुका अध्यक्षांनी आवाहन केले आहे.