खरीप रब्बी पिक विमा संदर्भात रेडिओवरून पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठी मुलाखत…

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

        प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत खरीप रब्बी व पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना राज्यात कशा प्रकारे व कोणत्या प्रकारे राबवली जाते याची माहिती प्रसार भारती आकाशवाणी द्वारे अमरावती केंद्राने पिक विमा मार्गदर्शक व जिल्हास्तरीय समिती पिक विमा शेतकरी प्रतिनिधी यांची श्री पुष्पक श्रीरामजी खापरे रा चांदूरबाजार यांची १४/०४/२०२३ शुक्रवारला मुलाखत ध्वनिमुद्रित करण्यात आली.

        यामध्ये पीक विम्याच्या फायदे तसेच पिक विमा कुठून काढला जातो. पिक विम्याची नुकसान भरपाई केव्हा मिळत नाही. पिक विमा साठी लागणारे कागदपत्र कोणती रब्बी फळ पिक विमा हा बँकेतूनच का निघतो सेतू वरून का निघत नाही सर्व गोष्टीवर भारतीय आकाशवाणीच्या माध्यमातून उत्तरे देण्यात आली. प्रसार भारतीय आकाशवाणी चे श्री अजय घरडे यांनी मुलाखत घेतली सोबतच प्रसार भारतीय आकाशवाणी अमरावती केंद्र निर्देशक विनोदी गवळी यानी सुद्धा सहकार्य केले. आतापर्यंत पिक विमा संदर्भात अमरावती विभागातून श्री पुष्पक श्रीरामजी खापरे यांची पहिल्यांदाच मुलाखत आकाशवाणी द्वारे घेण्यात आली. या मुलाखतीचे ध्वनी मुद्रणाचे प्रसारण २८/०४ /२०२३ रोजी रविवार सकाळी दहा वाजता प्रसारित करण्यात आले. या प्रसारणाचा सर्व शेतकरी बंधूंनी एफएम स्टेशनच्या द्वारे  लाभ घेतला. पुष्पक खापरे यांनी प्रसार भारती आकाशवाणी अमरावतीचे आभार मानले. 

प्रतिक्रिया

मी आजपर्यंत विविध वृत्तपत्र विविध न्यूज चैनल चा द्वारे माझ्या शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. परंतु आकाशवाणीची माझी पहिलीच मुलाखत असल्यामुळे मला व माझ्या शेतकरी बंधूंना भरपूर मोठा आनंद झाला त्याबद्दल मी माझ्या शेतकरी मित्रांचे व सर्व कृषी अधिकारी वर्गांचे मी आभारी आहे. 

पुष्पक श्रीरामजी खापरे जिल्हास्तरीय फळ पिक विमा शेतकरी विमा प्रतिनिधी