रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी
आसेगाव पूर्णा येथील अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झालेल्या ऑनलाईन निकाल मध्ये शंभर टक्के लागला आहे दरवर्षी निकालाची परंपरा जोपासणाऱ्या या कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षी सुद्धा निकालाची सर्वोत्कृष्ट परंपरा कायम ठेवली आहे यावर्षी ४९ विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षा प्रवीळ झाल्या होत्या. त्यापैकी पाच विद्यार्थिनी प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण असून चोवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या आहेत. व इतर विद्यार्थिनी द्वितिय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
प्राविण्य श्रेणीमधे प्रांजली मोहोड ७९ टक्के, महावीरा आसिफ ७७टक्के, तेजस्विनी आठवले ७७ टक्के, अंजली वैराळे ७५ टक्के, किरण नांदणे ७४ टक्के, प्रांजली सोलोव ७३ टक्के,तन्वी बोबडे ७२ टक्के, धनश्री गुरुसुंदरे ७१ टक्के, विश्वजीत मेटकर ७१टक्के, अंकिता पचारे ७० टक्के,आचल अमझरे ६८ टक्के,पायल अमझरे ६८टक्के,मेहर शेख ६७ टक्के, रंगानिया शेख ६७ टक्के या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मेघशाम करडे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्योतीताई माहोरे यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक अजय गाडबैल ,स्वती चाैधरी, मनोज तायडे व माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी सुनीता धवने, अनिता तांबट, नलिनी धाकडे, यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची श्रेय सुयोग्य शैक्षणिक वातावरण नेहमी तासिका सराव परीक्षा योग्य मार्गदर्शन व अध्यक्षांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा याला दिले ग्रामस्थातून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.