युवराज डोंगरे/खल्लार
विवाहीत महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाचा व्हिडीओ काढून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहीत महिलेशी वारंवार शारीरिक संबध केल्याची घटना खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कसबेगव्हान येथे घडली.
कसबेगव्हान येथील 35 वर्षीय महिला व आरोपी रोहीत प्रदीप गारडे (25) हे एकाच गावातील असून आरोपीने फिर्यादी महिले सोबतच्या संबंधाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी महिलेसोबत दि 1/1/23 ते 16/5/23 दरम्यान वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने खल्लार पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांनी आरोपीविरुध्द अप.क्र. 140/23, कलम 376(2)n,366,504,506,नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपी रोहीत गारडे हा फरार झाला असून खल्लार पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.