रामगाव जवळील अपघात झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू….

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

काल दि 2 मे रोजी खल्लार नजिकच्या सांगवा बु येथिल 45 वर्षीय इसम सुधाकर ओंकार डाहे यांचा दर्यापूरवरुन गावी सांगवा येथे दुचाकीने जात असताना रामगाव फाट्याजवळ अपघात झाला होता त्या अपघातात सुधाकर डाहे गंभीर जखमी झाले होते.

        त्यांना उपचारार्थ दर्यापूर येथिल उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपजिल्हारुग्णालयातील डॉक्टरांनी जखमीस अमरावती येथे स्थानांतरीत केले होते.

         मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले नागपूर येथे उपचार चालू असतानाच उपचारादरम्यान सुधाकर डाहे यांचे आज 3 मे ला सकाळी चार वाजताच्या सुमारास निधन झाले निधन झाले.

      सदर घटनेची नोंद खल्लार पोलिसात करण्यात आली आहे.