नवजीवन (सी.बी.एस.ई) मध्ये उन्हाळी शिबीराचे आयोजन… — शारिरीक विकासासाठी उन्हाळी शिबीर आवश्यक ठाकूर सर यांचे प्रतिपादन…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

          साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल सीबीएसई साकोली येथे १४ दिवसीय उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या उदघाटनीय कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. जितेंद्र ठाकूर, योगप्रशिक्षक लांजेवार सर, प्रमुख उपस्थिती प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास मॅडम, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान व शिबीर प्रमुख सतिश गोटेफोडै सर उपस्थित होते.

          विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक तसेच सर्वांगीण विकासाकरिता उन्हाळी शिबीर अत्यंत आवश्यक असून स्पर्धेत टिकणारे विद्यार्थी यातून तयार होणार असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी केले.

           तसेच इच्छाशक्ती असेल तर विद्यार्थी हा प्रत्येक स्पर्धेत टिकेल व शाळेचे नाव मोठे करेल व हे सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी उन्हाळी शिबीर उपयुक्त ठरणार आहे असे प्रतिपादन प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांनी केले. शिबीर प्रमुख सतिश गोटेफोडै यांनी शिबीरातील सर्व उपक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच या उन्हाळी शिबीरातील प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रवासात उपयोगी येणार आहे असे प्रतिपादन केले.

          या उन्हाळी शिबीरामध्ये योगा, कबड्डी, खो खो डॉज बॉल, वूड बॉल, थ्रो बॉल, आर्चेरी, एअर रायफल शुटींग, भाला फेक, थाली फेक, शास्त्रीय नृत्य, चित्रकला, कराटे या सारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन दिपा येले व आभार माधुरी हलमारे यांनी केले. उन्हाळी शिबीराकरिता सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.