अबोदनगो चव्हाण
तालुका प्रतिनिधी चिखलदरा
दखल न्युज भारत
चिखलदरा : नेहमीच मेलघाटातील शाळाबाबत सर्वस्तरावर नाके मूरडली जातात.अपयशाचा पाढा वाचला जातो.एकमेकांवर दोष देवून आपली जबाबदारी झटकण्याचा नेहमीच प्रयन्त केलाजात असलातरी याला काटकूंभ येथील जि.प.प्राथ.मराठी शाळा अपवाद ठरली आहे.येथील जि.प,प्राथ.मराठी शाळा काटकूंभ येथील तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानेशिरपेचात मानाचा तूरि खोवला आहे.काटकूंभ शाळेतील आरूषी नितेश मालविय,भाविका बाजीलाल बेठेकर, दिव्या अलकेश राठौर या तिन विद्यार्थीनींनी शिष्यवृत्ति परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असल्याने अतिदूर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या यशाने शापित मेलघाटच्या प्रतिमेला छेद देत अतिदूर्गम भागातही गूणवत्ता जोपासली जात असल्याचे सिद्ध झाले आहे.नेहमिच अतिदूर्गम भागातील गूणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते.पण प्रामाणिक प्रयन्त व जिद्द यामूळे यश खेचून आणता येते हे पून्हा एकदा साद्ध झाले आहे.
तिन्ही विद्यार्थ्यांचे यशाचे श्रेय जि.प.प्राथ,शाळा काटकूंभचे मूख्या, श्री.नामदेव अमोदेसर वर्गशिक्षिका वाडिवे मॅडम व सहकारी शिक्षकांना दिले जात असून सर्वञ उपरोक्त यशाबद्धल विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.