
दखल
प्रा.महेश पानसे…
व्हॉट्सअप,फेसबुक,ट्विटर,इन्स्टाग्राम या सायबर साधनांचा उपयोग युवा,युवती कुठल्या दिशेने करीत आहेत? याचे चिंतन करायला लावणारी एक घटना मूल पाेलिसांच्या प्रयत्नाने तडीस गेली.
सायबर साधनांचा चुकीचा वापर विघातक ठरत असल्याचे अनेक दाखले वारंवार बघायला मिळत आहेत.या पार्श्वभूमीवर मूल पाेलिस ठाणे क्षेत्रातील ही घटना चिंतन करायला लावणारी ठरते.
घटनेनुसार मूल पाेलिसांनी सायबर सेल च्या सहकार्याने ‘फ्रेंडरिक्वेस्ट’ ला बळी पडून,झपाटल्यागत आसाम राज्यात निघून गेलेल्या युवतीला शाेधून पालकांच्या स्वाधीन केले.
सायबर सेल च्या माध्यमातून मूल पाेलिसांनी युवतीला सुखरूप घरी पाेहाेचविले.महाविद्यालयीन युवतीला सुरक्षित भविष्य बहाल करणारी ही घटना दखलपात्र,पाेलिस विभागाचा सन्मान वाढविणारी तर आहेच,तेवढीच सायबर मिडीयाचा दुरूपयोग करणाऱ्यांना चिंतन करायला लावणारी आहे.
मूल पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानकीराम शंकर भाेयर रा. महाकाली कॅालरी चंद्रपूर यांनी कर्मवीर महाविद्यालय मूल येथे प्रथम वर्षात शिकत असलेली त्यांची मुलगी साक्षी ही सकाळी महाविद्यालयात गेली परंतू सायंकाळी घरी न परतल्याची फिर्याद घेऊन मूल पाेलिस ठाणे गाठले,फिर्याद नाेंदविली.
पाेलिस ठाणे प्रमुख तथा परिविक्षाधीन पाेलिस उप अधीक्षक प्रमाेद चौगुले यांनी या दखल पात्र फिर्यादी संबंधाने पाेलिस अधीक्षक चंद्रपूर यांचेशी सल्लामसलत करून शाेधपथक तयार केले.
यात पाेलिस सपाेनि.सुबोध वंजारी,महिला पाेलिस उप निरीक्षक वयात नैतिक, पाेहवा भाेजराज मुंडे,पाेअं संदिप चुधरी यांचा समावेश करण्यात आला.
शाेधपथकाने ठाणे प्रमुखांचे मार्गदर्शनात सायबर सेल च्या मदतीने मुलीचे माेबाईल नंबर वरून लाेकेशन मिळविले.लाेकेशन आसाम राज्यातील कचर जिल्ह्यात आढळले.
पाेलिस अधिक्षक,अति.पाेलिस अधिक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी व परिविक्षाधीन पाेलिस उप अधीक्षक याचे मार्गदर्शनात आसाम राज्यातील कचर जिल्हा पाेलिस अधिक्षक व संबंधित पाेलिस अधिकारी यांना या लाेकेशन नुसार शाेध मोहिमेनुसार कळविण्यात आले.
अतिशय जलद गतीने मूल पाेलिसांनी पाऊले उचलली.आसाम राज्यातील उंदरबाेङ पाेलिस ठाणे अंतर्गत मुलीचा शाेध लागल्यानंतर मूल ठाणे शाेध पथक लगेच आसाम राज्यातील कचर जिल्ह्यात पाेहाेचले.मुलीला साेबत घेऊन शाेध पथक परतले.
साक्षीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.पालकांच्या चेहऱ्यावर अर्थातच आनंद झळकला असेल.
मूल पाेलिसांचे सर्वत्र काैतुक हाेणे स्वाभाविक आहे.पाेलिस विभागाने मनावर घेतले तर असंख्य फिर्यादी आनंदी होऊन समाजात वावरताना दिसतील हे या घटनेनंतर लक्षात येते.
सदर घटनेनंतर महाविद्यालयीन युवतीने कथन केलेली आपबिती व व्हाट्सअ़ॅप,फेसबुक,ट्विटर या सायबर साधनांचा बेजबाबदारपणे केलेला वापर स्वताला व संपूर्ण कुटुंबाला दु:खात ढकलतो अन् सामाजिक स्वास्थ्य दूरगामी बिघङते या संबंधाने दिलेला संदेश मार्मिक व चिंतनीय ठरताे.
मूल पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षीने दिलेला संदेश बाेलका ठरताे.
“फ्रेंड्सरिक्वेस्ट”च्या चक्रव्युहात पुढे युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवीले जाते, पुढे आत्महत्येच्या धमक्या,ब्लॅकमेलिंग,फसवणूक……!
अशा अनेक दुर्दैवी घटनाक्रमातून युवतींना जावे लागते.
तरूणी,युवती,महाविद्यालयीन विद्यार्थीनिंनी स्वःताला सांभाळावे, हा साक्षीने दिलेला संदेश चिंतन करायला लावणारा आहे.
मूल पाेलिस ठाणे अधिकारी व शाेध पथकातील अधिकारी यांना सलाम…!