कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधि पारशिवणी
कन्हान : – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १० एप्रिल रोजी प्रथमच कन्हान शहरात येणार असुन ते महायुती चे उम्मेदवार राजु पारवे यांचा प्रचार जाहिर सभेला नागरिकांना संबोधित करणार आहे. अशी माहिती भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
रामटेक लोकसभा आरक्षित जागा अनुसूचित जाती करीता आरक्षित असल्यामुळे विविध पक्षातील राजकारणी नेत्यांनी आपला पसंतीचा उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली. भाजपा , शिवसेना , राष्ट्रवादी यांची युती असल्याने रामटेक लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतांची टक्केवारी वाढण्याकरीता भाजपा पक्षाने कमर कसली आहे. यातच कांग्रेस पक्षा मधून शिवसेना पक्षात प्रवेश करुन आमदार उमरेड विधानसभा राजू पारवे यांनी रामटेक लोकसभा निवडणुकीत आमदार सुनिल केदार यांच्या क्षेत्रात सरळ लढत आहे .
रामटेक मतदार संघातुन महायुती चे उम्मेदवार राजु पारवे यांना टिकट देण्यात आली आहे. राजु पारवे यांनी २७ मार्च ला नामांकरण दाखल केल्यानंतर रामटेक मतदार संघात शहरी आणि ग्रामीण भागात महायुती च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भेटी घेऊन निवडणुक प्रचाराला सुरवात केली आहे .
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कन्हान शहरात येणार असुन ते महायुती चे उम्मेदवार राजु पारवे यांचा प्रचार जाहिर सभेला नागरिकांना संबोधित करणार आहे . ही सभा शहरातील ब्रुक बाॅन्ड कंपनी परिसरात आयोजित करण्यात आली आहे . सोमवार (दि.१) एप्रिल रोजी रात्री नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी व मंगळवार (दि.२) एप्रिल रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , आमदार आशिष जयस्वाल यांनी नरेंद्र मोदी यांचा जाहिर सभा जागेची पाहणी करुन जागा निश्चित केली. नरेंद्र मोदी प्रथमच कन्हान शहरात येत असल्याने भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते आणि नागरिकांन मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .
या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी , डॉ मनोहर पाठक , विनोद किरपान , सतीश डोंगरे , संजय मुलमुले , राजेश ठाकरे , राहुल किरपान, सुनिल लाडेकर , नरेश पोटभरे , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , हिरालाल गुप्ता , नंदकिशोर चंदनखेडे , प्रशांत सायरे , मनोज गिरी , नरेश मेश्राम , व्यंकटेश कारेमोरे , कैलास बरबटे , वर्धराज पिल्ले , धर्मेंद्र शुक्ला , सतीश डोंगरे ,अॅड.आशा पनिकर सह आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .