दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महागाई, स्त्रीयांवरील अत्याचार, जातीयवाद, बेरोजगारी या प्रमुख मुद्द्यासहित युवकांचे रोजगार गुजरातला पळवणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात महिला तसेच युवकांमध्ये तीव्र नाराजी असून, सर्वसामान्य नागरिक, बेरोजगार युवा या जुलमी सरकारला मातीत गाडायला स्वतःहून पुढे सरसावली आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभेची ही निवडणूक लोकांनी स्वतःच्या अंगावर घेतली आहे.लोक शरदचंद्रजी पवार यांच्या बाजूला उभे राहतील याचा ठाम विश्वास आम्हाला आहे.
यावेळी खेड आळंदी विधानसभेतील मायबाप जनता खासदार अमोल कोल्हे यांना सर्वाधिक मताधिक्य देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित आर.आर. पाटील यांनी व्यक्त केला.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाचे उमेदवार श्री अमोल कोल्हे साहेब यांच्या प्रचारार्थ दौऱ्यावर आळंदी येथे युवकांशी संवाद साधून अमोल कोल्हे साहेबांना प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन केले यावेळी रोहित पाटील यांनी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दर्शन घेतले.
यावेळी तुषार कामठे, विकास लवांडे, सुधीर मुंगसे, रमेश गोगावले, विलास कुऱ्हाडे, शशीराजे जाधव, आशिष गोगावले, सतीश कुऱ्हाडे, मनोज पवार, अमित कुऱ्हाडे, दिनेश कोळेकर, मंगेश तिताडे, निखिल तापकीर, मंगेश आरु तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.