पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या मुख्य यात्रेला सोमवार दिनांक 1 एप्रिल पासून सुरवात… — दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी देवाच्या मानाच्या घोड्याची गावातून ग्राम प्रदक्षिणा फटाक्यांच्या व वाद्यांच्या आतिश बाजीत काढण्यात आली…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

       सालाबाद प्रमाणे पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर गावचे ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या मुख्य यात्रेला सोमवार दिनांक 1/ 4 /2024 रोजी सुरुवात झाली. सोमवार पासूनच यात्रा मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे मंगळवारी सकाळी नैैवद्य , नारळ व नवस फेडण्यासाठी तसेच दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होत आहे.

            यात्रेमध्ये विविध प्रकारचे खेळण्याचे व मिठाईचे मोठ्या प्रमाणात स्टॉल आल्यामुळे पिंपरी बुद्रुक गावात मोठ्या उत्सवाचे वातावरण झाले आहे. 01/04/2024 पासून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. पाहुणे व नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.

            संपूर्ण गावामध्ये आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संध्याकाळी नऊ वाजता मानाच्या घोड्याची मिरवणूक छबिना वाजत गाजत फटाक्यांच्या आवाजात काढण्यात आला व त्यानंतर प्रकाश अहिरेकर सह निलेश कुमार अहिरेकर यांचा प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा हा भाविकांच्या मनोरंजनासाठी सादर करण्यात आला. तमाशाचा आनंद भाविकांनी घेतला. 

         पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, तसेच आजी माजी सरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष, साखर कारखान्याचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाईट चेअरमन, पोलीस पाटील व तरुण कार्यकर्ते ,

           गावकरी व ग्रामस्थ आणि पिरसाहेब यात्रा कमिटी, शिवशक्ती तरुण मंडळ, राजमुद्रा प्रतिष्ठान कार्यकर्ते यांच्या वतीने, यात्रेचे नियोजन ,संपूर्ण गावची स्वच्छता, व दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कोणत्याही अडचणी भाविकांना येऊ दिलेल्या नाहीत.

             पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील गावचे ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या यात्रेला सोमवार पासुन सुरुवात झालेली असून शेवटी आज बुधवारी दिनांक 3 एप्रिल रोजी राज्यातील नामांकित मल्लांच्या कुस्त्यांच्या जंगी मुकाबलाने यात्रेची सांगता होणार आहे.

          इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील सर्वधर्म सम भावाचे प्रतीक आसणारे पिरसाहेब देवस्थान यांची सालाबाद नियम परंपरा प्रमाणे यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते भागा भगातून व अनेक गावातून मोठ्या संख्येने हजारो भाविक व ग्रामस्थ येत असतात.

         तसेच आज बुधवार 3 एप्रिल रोजी तीन वाजता पुणे, सोलापूर ,सांगली, कोल्हापूर,जिल्ह्यातील नामांकित मल्लांच्या कुस्त्याने यात्रेची सांगता होणार आहे.

   चौकट

नौशाद शिकिंदर शेख यांच्या परीवारच्या वतीने पहिल्या दिवशी सोमवार दिनांक 1 रोजी महाप्रसाद व देवाच्या ग्राम प्रदक्षणासाठी डीजे वाद्य देण्यात आले.