रोहन आदेवार
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
मारेगाव : तालुक्यातील कुंभा – खैरी रस्त्यांची अतीशय दुरावस्था झाली असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बुरांडापासून कुंभा ते खैरी साधारणता आठ ते दहा कीलोमीटर या रस्त्याचे अंतर असून, हा रस्ता पूर्ण उखडला गेलेला आहे.
“रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते,अशी अवस्था झाली आहे. या रस्त्याहून रुग्ण घेऊन जाणे धोक्याचे ठरत आहे. त्याचबरोबर वाहनचालकांचीही तेवढीच डोखेदुखी हा रस्ता बनला आहे. एखादे समोर वाहन जात असले तर मागाहून जाणाऱ्या वाहन चालकांना धुळीचा सामना करावा लागतो.
यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे,यासाठी येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. येत्या काही दिवसांत या रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
काही जणांना या खराब रस्त्यामुळे मणक्याचे आजार ही जडत आहेत. तर वाहने पंचर होण्याच्या प्रमाणातही वाढ होत असून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असून या रस्त्याचे काम तत्काळ करण्याची मागणी नागरिकांनी कडून होत आहे.