युवराज डोंगरे
जिल्हा प्रतिनिधी
अमरावती
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेतून उत्पादक कामाची निर्मिती व्हावी , ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळावा , ग्रामीण भागात वृक्षालागवड , पांदण रस्ते , विहिरी , तलाव या सारखे गाव विकासाचे कामे राबवून बेरोजगारांना रोजगार मिळवून द्यावा या उदात्त हेतूने सुरू झालेली ही योजना आज भ्रष्टाचाराचे मूळ कारण बनलेली आहे.
असाच एक मोठा भ्रष्टाचार आमला ( एंडली ) ग्रामपंचायत मध्ये उघडकीस आला आहे.आणि त्याची तक्रार गावातीलच ग्रामपंचायत सदस्य अमोल नंदकिशोर राऊत यांनी गटविकास अधिकारी आणि आता जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.
सदर प्रकरणातील रोजगार सेवक हा २०१६ पासून रोजगार सेवक म्हणून काम करत असून ग्रामपंचायतने ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याला कामावर रुजू करणे बंधनकारक होते.
परंतु तसे न करता संबंधित रोजगार सेवकाला नियमबाह्य पद्धतीने कामावर रुजू केले असून त्याचे नियुक्तीपत्र ग्रामपंचायत दप्तरी उपलब्ध नाही.त्याला कोणत्या आधारा नुसार कामावर नेमले हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
तत्पूर्वी रोजगार हमी योजना ही जनकल्याणासाठी असून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी हा या योजनेचा मूळ उद्देश असतो.परंतु संबंधित रोजगार सेवकाने लागल्या पासून म्हणजेच २०१६ ते २०२३ या काळात आपल्या कुटुंबातील लोकांनाच या योजनेत प्राधान्य दिल्याचे निदर्शनास आले.
अस असतानाही रोजगार सेवकाने बोगस मजूर दाखवून लाखो रु.भ्रष्टाचार केला.जे मजूर कधी कामावर गेलेच नाही त्यांना वृक्षलागवडीच्या कामावर किंवा इतर कामावर दाखवून संबंधित रोजगार सेवकाने स्वतःचे घर भरले असून शासनाची दिशाभूल करून पैसे हडपले असा आरोप तक्रारदाराने केला आहे.
यामुळे शासन निर्णयानुसार त्याची सखोल चौकशी करून त्यात भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून ,पैसा वसूल करा व त्याला कामावरून तात्काळ काढून टाका या संबंधीचे पत्र तक्रारदार ग्रा.पं सदस्य अमोल नंदकिशोर राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असून निर्णय न लागल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.