कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान : – पावन नदीच्या काठावरील ॐ महाकाली मंदिर सत्रापुर, कन्हान येथे घटस्थापना करून चैत्र नवरात्रोत्सवाचा शुभारंभ करून भजन, पुजन, आरती व पावन कन्हान नदीच्या जल प्रवाहात घट विसर्जन करून महा प्रसाद वितरणाने चैत्र महाकाली उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
रविवार (दि.२६) मार्च २०२३ ला सकाळी ९ वाजता घटस्थापना करून ॐ महाकाली मंदिर सत्रापुर, कन्हान येथे मा. सनंदजी गुप्ता यांच्या शुभ हस्ते पुजा अर्चनासह घटस्थापना करून चैत्र महाकाली उत्सवा चा शुभारंभ करून दररोज सकाळ, संध्याकाळ पुजा अर्चना, आरती, भजन, जस आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून सोमवार (दि.३) एप्रिल २०२३ ला सकाळी ८.३० वाजता पुजा अर्चना करून मातेच्या जयघोष करित भजन पारंपारिक वाद्याच्या मधुर स्वरात कन्हान नदिच्या पावन पात्रात घटविसर्जन करून महाप्रसाद वितरण करून चैत्र महाकाली उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
या उत्सवात विदर्भातील व परिसरातील भाविक भक्त मंडळीनी बहु संख्येने या चैत्र महाकाली उत्सवात उपस्थित होऊन ॐ महाकाली मातेचा दर्शनाचा लाभ घेतला. घट विसर्जन कार्यक्रमा त सर्वश्री भजन व जस मंडळ कन्हान व्दारे भजन व जस गायन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता मुख्य पुजारी उत्तमराव दुरूगकर बाबा आणि ॐ महाकाली सेवा समिती सत्रापुर, कन्हान चे सचिव प्रकाश कृष्णराव कडु, सर्व सदस्य आणि भाविक मंडळीने सहकार्य केले आहे.