“हिट अँड रन,कायदा रद्द करा..  — अन्यथा आंदोलनचा इशारा..

    अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

 

सिंदेवाही- “हिट अँड रन,कायदा रद्द करणे बाबत.” सिंदेवाही तालुक्यातील चालक-मालक संघटनेंने तहसीलदार व ठाणेदार यांचे मार्फत पंतप्रधान भारत सरकार नवी दिल्ली,गृहमंत्री भारत सरकार, नवी दिल्ली,परिवहन मंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले.

          सदर निवेदनात म्हटले आहे की,अपघात घडल्यास जखमीना मृत्युच्या दारी सोडून पळून जाणे के प्रत्येक मानवी मणाला पटण्यासारखे मुळीच नाही.परंतु अपघात झाल्यावर वाहन चालकाच्या मनात इमानदारीने अपघात ग्रस्तांना मदत करण्याची इच्छा असतानाही विनाकारण वाहन चालकाला होणारी मारहाणी पासून वाचण्यासाठी वाहन चालक पळून जातात.

           स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रा मध्ये जन्मजात गुणवधर्म आहे.

        आपल्या भारत देशामध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे.तशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जिवाच्या भितीने आपघात स्थळावरुण पलायन करतो.

         यामुळे ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमतः अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर,”हिट अँड रन,या नवीन कायद्यामध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड मर्यादा कमी करुण त्या नंतरच कायदा लागू करावा असी मागणी आहे.

          सदर कायदा रद्द करण्यात यावा,अन्यथा रास्ता रोको आनंदोलन शिवाजी चौक सिंदेवाही येथे करण्यात येईल.असा इशारा वाहन-चालक मालक संगठने तर्फे देण्यात आला.

          सदर आंदोलना दरम्यान कोणतीही अनुसूचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे सुध्दा निवेदनात नमूद करण्यात आले आहे.