भिमा कोरेगाव शौर्य दिन आणि अत्याचारग्रस्त वंचित समाज…

 दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादिका

            आज नवीन वर्षाचा प्रारंभ आणि भिमा कोरेगाव विजयी दिवस.. दोन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.या दोन्ही दिवशाच्या निमित्ताने देशातील नागरिक आपापल्या परीने भावना व्यक्त करतो आहे.”शुभेच्छा देतो आहे.

             पारतंत्र्याचा काळ म्हणजे देशांतर्गत पेशवाईचे व ब्राह्मणशाहीला पोषक असलेल्या अनेक राजेशाहीचे साम्राज्य.. राजेशाहीचे साम्राज्य म्हटले की त्यांच्या परीने ते राज्य चालवणारे एकप्रकारचे हुकुमशहाच..

        मात्र,बाजीराव पेशवा यांच्या राजवटीत मानुष्किची मुस्कटदाबी करुन क्रुर अत्याचार करणारी भेदभावयुक्त जातीयवादी व्यवस्था लागू करण्यात आली होती.

            पेशव्यांच्या कथीत जुलमी अशा जातीवादाच्या विरोधात लढलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो लोक १ जानेवारीला महाराष्ट्र राज्यातील भिमा कोरेगाव जवळील जयस्तंभ येथे जातात.

          भिमा कोरेगाव पुणे जिल्ह्यातंर्गत असून कोरेगाव भिमाजवळील पेरणे गावात असलेल्या जयस्तंभला देशातील लाखो लोक भेट देतात आणि श्रद्धांजली वाहतात.या दिवसाला विजयी दिवस अर्थात शौर्य दिन म्हणतात.

             भीमा कोरेगाव युद्ध १ जानेवारी १८१८ मध्ये झाले.पेशवाई विरुद्ध महार लढाई अर्थात जुलमी राजवटी विरुद्ध न्याय लढाई १ जानेवारी १८१८ मध्ये जिकरीने लढल्या गेली.यात महारांच्या ५०० शुरविरांनी पेशव्यांच्या २८ हजार सैनिकांना सडो की पडो करुन सोडले व जातीवादाच्या विरोधातील लढाई जिंकली.

        पारतंत्र्याच्या काळात इंग्रज राजवट देशात असल्यामुळे त्यांनी जातीयवादी परंपरेला अमान्य केले होते.

        पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होते.या पालनानुसार महारांना अत्यंत हिन वागणूक दिली जात असे.याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी लढले आणि विजयी झाले.

          कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फुट उंच विजयीस्तंभ उभारुन त्यावर ४९ विर सैनिकांची नावे कोरली.यामध्ये २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे आहेत.

          आज सुद्धा भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भारत देशातील लाखो लोक मानवंदना देण्यासाठी तिथे पोहोचले आहेत व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहेत.

                याचबरोबर भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

             सांस्कृतिक कार्यक्रमांतंर्गत लोकप्रिय व लोकप्रशिध्द गायकांनी आपल्या प्रबोधनात्मक गित गायनाच्या माध्यमातून भिमा कोरेगाव शौर्य दिनावर प्रकाश टाकला आहे.

           मात्र,स्वातंत्र्याच्या काळातही बहुजन समाजातील नागरिकांवर पेशवाईचे अत्याचार सुरू आहेत हे नाकारून चालणार नाही..