शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधि

          इंदापूर:- येथील,शिवसृष्टीचे संपादक धनंजय लक्ष्मणराव कळमकर पाटील यांची भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

           सदरची नियुक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुर शेख यांनी केली असुन, नियुक्ती पत्र प्रदान करताना भारतीय पत्रकार संघाचे लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष अॅड. कैलास पठारे, उपाध्यक्ष,अॅड. पांडूरंग ढोरे पाटील, भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ, लिगल विंगचे पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड. समीर बेलदरे पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख, सचिव काशिनाथ पिंगळे इ. मान्यवर उपस्थित होते.

          इंदापूर तालुक्यात 1998 साली पत्रकारीतेला धनंजय कळमकर यांची सुरुवात पत्रकार क्षेत्रातील दमदार लेखणी,व कवि रामदास देवकर दैनिक सामना पुढारी चे प्रतिनिधी यांच्याबरोबर झाली त्यानंतर सलग पाच ते सात वर्षे वेगवेगळे पेपरला काम करून अनुभव मिळवला.

           इंदापूर तालुक्याचे सुपुत्र शिरूर तालुक्यातील म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. नागनाथ शिंगाडे यांचे सा.नागरिक समता अनेक दिवस चालवला. त्यामध्ये इंदापूर तालुका दर्शन हे पुस्तक ही काढले त्यावर अनेक जणांनी तालुक्याची माहिती घेऊन पीएचडी मिळवली आहे, अनेक पेपरला इंदापूर प्रतिनिधी म्हणून काम केले. नंतर स्वतःचे शिवसृष्टी नावाची साप्ताहिक सुरू केले नंतर स्वराज्य निर्माता म्हणून एक मासिक चालू केले.

         लक्ष्मी वैभव चे संपादक विलासराव गाढवे,व शिवसृष्टी चे संपादक धनंजय कळमकर जय वीरूची जोडी यांनी आपल्या धारदार लेखणीतून इंदापूर तालुक्यातील तळागाळातील गरजू व्यक्तींच्या बातम्या छापून अनेकांना सुता सारखे सरळ ही केले. तळमळीने पत्रकारिता सुरू आहे म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाने इंदापूर तालुका सचिव म्हणून धनंजय कळमकर यांची निवड केली.

          यामध्ये हाजी एम.डी. शेख राष्ट्रीय अध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष संदेश शहा, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलकंठ मोहीते,सचिव सागर शिंदे, शहराध्यक्ष सुरेश जकाते तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शौकत भाई तांबोळी व मार्गदर्शक म्हणून विलासराव गाढवे,महेश स्वामी, जावेदभाई मुलाणी, शैलेश काटे,संतोष आटोळे, तर खंबीर साथ कैलास पवार सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार महादेव चव्हाण सर यांची मोलाची साथ मिळाली.

             त्यानंतर तालुक्यातच इतरांनाही संधी मिळावी म्हणून भारतीय पत्रकार संघ या संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय कळमकर यांची निवड झाली. या निवडीनंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा येतोचीत असा सन्मान कार्याचा सन्मान केला.