कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
बोर्डा रोड रेल्वे क्रॉसिंगवर 3 फेब्रुवारी 2005 रोजी घटनेच्या ठिकाणी रेल्वे अपघातात मरण पावलेल्या निरपराध 57 जण मृत व्यक्तींचे स्मरण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
3 फेब्रुवारी 2005 रोजी रामटेक-नागपूर पॅसेंजर ट्रेनमध्ये लग्नाची मिरवणूक घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला होता,त्यात 57 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा अपघात नागपूर जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा होता.
सदर रेल्वे क्रॉसिंग वर एकही फाटक नाही,त्यामुळे ही घटना घडली.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अपघातस्थळी मृत व्यक्तींचे स्मरण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी तालुका काग्रेसचे अध्यक्ष दयाराम भोयर,शेतकरी नेता संजय सत्येकर,माजी पोलिस पाटील श्रीराम नांदूरकर,शिवसेना तालुका प्रमुख कैलास खंडार,नितेश गभणे,अंकुश वाडीभस्मे,संजय इंगोले, देवाशिष सत्येकर,राजू आदीप्रामुख्याने उपस्थित होते.
अपघातस्थळी सरोदे,नरेश गुप्ता,नीलेश जुमले,विनायक उईके,कैलास काकडे,तुकाराम वानखेडे,पार्वती यादव,काजल यादव,कीर्ती यादव,रमाकांती गुप्ता उपस्थित होते.