दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : इंदोरी येथील ज्ञानपर्व प्रकाशनाच्या वतीने आणि संत साहित्याच्या अभ्यासिका विद्या काशीद यांनी तुकाराम महाराजांच्या नामावलीवर लिहिलेल्या भाग्य आम्ही तुका देखियेला या पुस्तकाचे प्रकाशन माघ शुद्ध दशमी सप्ताहात झाले. भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ आणि मान्यवरांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. संत तुकाराम महाराजांचे पणतु श्री गोपाळ महाराज रचित तुकोबारायाची नामावली आहे.
त्या नामावलीतील १०८ उपाधीचे अर्थाचे विश्लेषणात्मक लेखन केले आहे. या पुस्तकाला ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी अशिर्वाद दिला आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याला माजी आमदार विलास लांडे पाटील, भंडारा डोंगर देवस्थान समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, साहित्यिक नामदेव जाधव, डॉ.कल्पना काशिद, शैला खांदवे, हेमा शिंदे, वर्षा ढोरे, गजानन शेलार, संदीप काशिद, संतोष खांडगे, रवींद्र महाराज ढोरे, दामोदर शिंदे, बबन ढोरे, विलास ढोकले, अरुण काशिद, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी वाघ महाराज म्हणाले, सर्वाना ही नामावली माहीत आहे. मात्र त्याचा अर्थ सर्वांना एकत्रीत रित्या माहित व्हावा यासाठी विद्या काशिद यांनी अभ्यासपूर्ण संशोधन करून उपाधीचा अर्थ काय असेल, याबाबत विश्लेषन केले आहे. त्यासाठी त्यांनी अभंगाचाच आधार घेत नामावलीतील उपाधी तुकोबारायांना किती समर्पक आहे ह्याचा दाखला दिला आहे.
बाळासाहेब काशिद म्हणाले, विद्या काशीद यांनी यापूर्वी भंडारा डोंगरावर आधारित ज्ञानभंडारा हे पुस्तक प्रकाशित केले आहे. आता हे त्यांचे तुकाराम महाराजांवर दुसरे पुस्तक आहे.