चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:- माननीय प्रफुल भाई पटेल यांच्या आदेशानुसार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या सर्वसामान्य जनतेच्या विकासात भरीव कार्य व पक्ष संघटना बळकट व शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्याच्या उद्देशाने सदर जबाबदारी देण्यात आली असून जिल्हा अध्यक्ष नाना पंचबुद्धे, सुनील भाऊ फुंडे मो. अशपाक हाजी अब्दुल सलाम, यांच्या नेतृत्वात साकोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल च्या अध्यक्ष पदी अबू भाई अलान तर जिल्हा उपाध्यक्षपदी राशीद कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती चे श्रेय माजी आमदार राजेंद्र जैन, सुनील भाऊ फुंडे,अध्यक्ष भंडारा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, प्रभाकर सपाटे महासचिव भंडारा जिल्हा काँग्रेस पार्टी यांना दिले असून त्यांचे तालुक्यात व जिल्ह्यात पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.