नीरा नरसिंहपुर दिनांक: 3
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न झाली
पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच ज्योती श्रीकांत बोडके यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व ग्रामस्थ आणि सदस्य यांच्या उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी. अधिकृत शासनाच्या धोरणा नुसार सर्व विषय ग्रामसभेत मांडून सरपंच व सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने मान्यता घेऊन व सर्वच ऐनवेळी येणाऱ्या विषयाला देखील ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली.
ग्रामसभेत सरपंच ज्योती बोडके बोलत आसताना म्हणाल्या की गावातील महिलांनी दिलेला दारूबंदीचा ठराव हा मान्य आसून सर्वच महिलानी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन दारूबंदी करूया कित्येकांचा प्रपंचा दारूमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. इथून पुढे आशा घटना होऊ नये दारूचे व्यसन गावाला लागले नाही पाहिजे याचा विचार करणे गरजेचे आहे. दारूचे व्यसन नसेल तर त्या कुटुंबात संस्कार चांगले घडतील सरपंच ज्योती बोडके यांचे ग्राम सभेमध्ये उद्गार.,,
ग्राम सभेमधील महत्त्वाचे विषय राष्ट्रीय लोक अदालत,,माझी वसुंधरा अभियान 3.o,, कुष्ठरोग जनजागृती, प्रधानमंत्री आवाज घरकुल योजना,, रमाई घरकुल योजना,, जलजीवन मशीन जीपीडीपी अंतर्गत आराखडा,,
समाजात प्रचलित अनिष्ट विधवा प्रथा बंद करणे,, पतीच्या निधना वेळी पत्नीचे कुंकू पुसणे गळ्यातील मंगळसूत्र तोडणे बांगड्या फोडणे पायातील जोडवी काढणे यासारख्या कृप्रथीचे समाजात पालन केले जाते.
प्रथा या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्या प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊन दिले जात नाही या कृपस्थांचे पालन होत आसल्याने आशा प्रतिमेचे जीवन जगण्याचा मानवी तसेच सविधान अधिकाराने उल्लंघन होते सदर महिलांना इतर महिलाप्रमाणे जगण्यास पूर्ण अधिकार आहे. यामुळे आशा प्रतिला निर्मूलन होने आवशक आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन ग्रामसभेमध्ये सर्वांच विषयावर मंजुरी घेण्यात आली.
ग्रामसभेसाठी सरपंच ज्योती बोडके उपसरपंच पांडुरंग बोडके सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्वच आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि महिला भगिनी व ग्रामसेवक गणेश लंबाते, ग्रामपंचायत कर्मचारी हे सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.