आशिष धोंगडे
प्रतिनिधी
वाशिम :-अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.०२/०२/२०२३ रोजी मानोरा येथे धर्मनिरक्षता मूल्याबाबत एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेमध्ये सामाजिक न्याय,प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व,पर्यावरण, धर्मनिरिक्षता,स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा या मूल्याबाबत युवकांना खेळाच्या व गाण्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
या एकदिवशी कार्यशाळेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून मा.महावीर धाबे (प्राध्यापक) मा.सीमा खेमवाणी (मॅडम) मार्गदर्शक म्हणून मा.सतीश भगत (अनुभव साथी) मा.आशिष धोंगडे (अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक) हे या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये धर्मनिरक्षता या मूल्य आधारित युवक व युवतीकडून ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मूल्य समजावून सांगण्यात आले.या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये मानोरा येथील युवक व युवती मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.व अशाप्रकारे धर्मनिरक्षता या मूल्य आधारित एकदिवसीय कार्यशाळा मानोरा येथे संपन्न झाली….