कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान – कन्हान परिसरातील न्यु गोंडेगाव येथे मा.मारोतीजी लसुंते यांच्या निवास स्थानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री समर्थ सद्गुरु भाकरे महाराज यांच्या १०२ व्या जयंती निमित्य शनिवार आणि रविवार असे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी ला सायंकाळी ६:०० वाजता हरिपाठ व नंतर रात्री ९:०० वाजता पासुन रात्रभर भजन , कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन आणि रविवार दिनांक ५ फेब्रुवारी ला सकाळी ११:०० वाजता काल्याचे कीर्तन आणि दुपारी ३:०० वाजता पासुन भव्य महाप्रसाद असे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन विलास लसुंते , सरिता लसुंते आणि समस्त लसुंते परिवारांनी केले आहे .