प्राजक्ता माळी बाजारु स्त्री आहेत काय? हलकट आणि निर्लज्ज राजकारणी बोलतांना संयम बाळगत नाही. — पत्रकारांचा भिकारडेपणा सहन करण्यापलीकडचा… 

 दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

               वृत्त संपादीका 

       अत्यंत संवेदनशील अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना नको ते स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली.प्राजक्ता माळी यांचे दुर्दैव नाही तर हे राजकारणाचे दुर्दैव आहे आणि पत्रकारिताही दुर्दैवी झाली आहे.

          राजकारणी आजकाल बोलताना संयम पाळत नाहीत.सुरेश धस या हरामखोरी करणाऱ्या आमदाराने आपल्या बाईटमध्ये जी काही धसकटे कापली त्यामुळे प्राजक्ता माळी यांचे व्यथित होणे स्वाभाविक होते. 

         आमदार सुरेश धस यांनी जे दिवे लावले ते अत्यंत हीन आणि खालच्या पातळीवरील बेरकी दर्जाचे होते.त्या दिव्याचे तेल अत्यंत घाणेरडे होते आणि सुरेश धस यांची मानसिकता तर अत्यंत हीन दर्जाची होती.हे सांगायला आम्हाला जराही वाईट वाटत नाही. 

       स्त्री ही कुठलीही असो.तिच्या अब्रूची लक्तरे अशा भाषेत टांगणे हे कोणाही महिलेला अत्यंत क्लेशदायक असते.सुरेश धस ज्या पद्धतीने महिलांच्या बाबतीत बोलले,तसेच पुरुषांच्या बाबतीत का नाही बोलले? हा संकलक आणि प्रसारक गजानन तुपे यांचा प्रश्न आहे.पुरुषांची अब्रू असते आणि स्त्रीची अब्रू नसते काय?  

        या गोष्टीची धस यांना जर जाणीव असती तर सुरेश धस यांनी सत्ताधारी पक्षाचा एक जबाबदार आमदार असतांना सडकछाप वक्तव्य अजिबात केले नसते.आमदार धस यांनी उडता…उडता जी मुक्ताफळे उधळली,त्यामुळे उथळ यु-ट्युब वाले आणि भाषा भिकारडे पत्रकार जणू काही त्यांना वाट्टेल ते लिहायला परवानाच मिळाला आहे.अशा आवेशात ते तुटून पडलेले आहेत. 

        कलावंतांना कलावंत म्हणून जी भूमिका पार पाडावी लागते त्या भूमिकेचा आणि त्यांच्या एकूण वर्तनाचा वाटेल तसा अर्थ काढणे हे अत्यंत चुकीचे आहे.विशेषता या प्रकरणात संबंधित अभिनेत्रीवर तो घोर अन्याय करण्यासारखे नाही काय? 

        प्राजक्ता माळी यांच्याबरोबर त्यांची आई होती, त्यांचा भाऊ होता.त्या सर्वांच्या चेहऱ्यावर असलेली उदासी अगदी स्पष्टपणे दिसत होती.आपली आई हे वक्तव्य ऐकल्यापासून झोपलेली नाही,असे प्राजक्ताने सांगितले.

        आपल्या प्रतिभावान आणि यशस्वी मुलीच्या बाबतीत एका आईने हळवे होणे अत्यंत स्वाभाविक आहे.महिलेची अब्रू काचेसारखी असते.एकदा तडा गेला तर काय होईल?हे सांगता येत नाही. 

        सुरेश धस यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागावी.अशी साधी विनंती पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी यांनी केली होती.त्यावर सुरेश धस यांनी निर्लज्जपणे आपण माफी मागणार नाही असे म्हणणे म्हणजे हा हलकटपणाचा कळस आहे. 

        अहो तुम्ही आमदार आहात,खूप दमदार आहात, म्हणजे तुम्हाला वाटेल तसे बोलण्याचा परवाना मिळालेला नाही.प्राजक्ता माळी यांची आतापर्यंतची कारकीर्द अतिशय यशस्वी आहे. 

        प्राजक्ताच्या वागण्यातील अदब तसेच अनेक नामवंत कलावंतांसोबत फिल्मी दुनियेत राहूनही आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे त्यांचे कौशल्य आणि कसब सर्वांनाच ठाऊक आहे.कलावंतांना अनेकदा अनेक ठिकाणी जावे लागते.अनेक कार्यक्रम करावे लागतात.

         अशा एखाद्या कार्यक्रमात कोणी सत्कार केला आणि त्याचे फोटो काढल्यावर,त्यातून भलत्याच मानसिकतेने भलतेसलते अर्थ शोधून काढणे आणि त्यावरून चारित्र्यहनन करणे हा गुन्हाच आहे असे प्राजक्ता म्हणतात. 

       आपण मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतीत तक्रार करणार आहोत,हे प्राजक्ताचे म्हणणे अतिशय योग्यच आहे.राज्याच्या प्रथम नागरिकाला आपली व्यथा सांगितलीच पाहिजे. 

       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत ? ते या धसांची धसकटे कशी वाईट आहेत.त्यासोबतच अत्यंत अनुपयुक्त आणि अवेळी उच्चारलेली आहेत.हे बघून धस यांना जोरदार तंबी देतील?…

       अकारण प्राजक्ताच्या झालेल्या बदनामीबद्दल गंभीरपणे माफी मागण्याचाही सल्ला देतील? अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.

         प्राजक्ता माळी अत्यंत प्रांजळपणे कोणाचीही भीडभाड न बाळगता आपल्या बावन्नकशी बुद्धीच्या जोरावर ज्या हिमतीने पत्रकारांच्या समोर आल्या आणि आपली बाजू मांडून आपल्याला काय क्लेश झाले आहेत ते सांगितले.त्याबद्दल प्राजक्ता निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. 

       भविष्यात त्यांना मोठे यश लाभो आणि या बदनामीच्या जंजाळातून त्यांची मुक्तता होवो,असे मत 

श्रीकृष्ण तनसुखदास चांडक,संकलक 

गजानन तुपे मुंबई,ठाणे-पालघर,नाशिक यांनी जाहीर व्यक्त केले आहे.