
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातून वाहणाऱ्या व गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या संगमावरील व्याहाड बुज. जवळील वैनगंगा नदितिरावर भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव कार्यक्रम दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी ऑल इंडिया शेड्युल कॉस्ट फेडरेशन च्या वतीने आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रम शेडयुल्ड कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विनय बांबोळे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिआचे (A) राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटिल भोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी कार्याध्यक्ष भुपेश थुलकर , नरेश वानखेडे , गुप्तमन्यु मेश्राम नागपूर , संजय मेश्राम डायरेक्टर रिअल स्टार मार्केटिंग गडचिरोली , रिपब्लिकन पार्टी चे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाईचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष कोमल रामटेके , गुरुदास रामटेके चंद्रपूर , शेकाफेचे जिल्हाध्यक्ष पंडित मेश्राम , उपाध्यक्ष सोपानदेव म्हशाखेत्री तर स्वागताध्यक्ष रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटिल यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, भिमा कोरेगांव शौयदिन सलामी का करतो तर भिमा कोरेगांव येथील पाचसे बटालियन महार शुरविरांनी अठ्ठाविस हजार पेशवांना कापले आणि आपले शौर्य दाखविले त्या शुरविरांना स्मरण करण्याकरीता आजचा दिवश संपूर्ण जगात शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
रिपब्लिकन चळवळी बाबत त्यांनी सांगीतले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असुन आम्ही A म्हणजे आंबेडकर नावाने पार्टी चालवितो. आम्ही खासदार रामदास आठवले यांना पक्षातुन बाहेर काढल्यामुळे त्यांना दुसरी आरपिआय काढावी लागली. आमची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पार्टीच्या शाखा संपूर्ण देशभरात आहेत. आरपिआय च्या १७ पार्ट्या आहेत परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) हाच पक्ष खरा आंबेडकरांचा वारसा चालवतो असे सांगितले.
याप्रसंगी शेकाफेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड विनय बांबोळे म्हणाले की , भिमा कोरेगांव शौय दिनाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी या ठिकाणी साजरा करीत असतो. यापुढे आम्हाला दीपस्तंभासाठी व कार्यक्रमासाठी जागा घेण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. बुद्ध गया मुक्ती मोर्चा लवकरच काढण्याचा सुतोवास त्यांनी यावेळी केला.
कार्यक्रमाचे संचालन दिलीप गोवर्धन यांनी केले , प्रास्ताविक पंडीत मेश्राम यांनी तर आभार अरुण शेंन्डे , यांनी मानले.कार्यक्रमास मिलिंद भानारकर , रुपेश सोनटक्के , हेमंत पा. मेश्राम ‘ सोपानदेव म्हशाखेत्री ‘एम .डी चलाख , शरद लोणारे , अमोल मेश्राम , किशोर उंदिरवाडे , नंदेश्वर खोब्रागडे , सुनिता राऊत ,रजत रामावत , राहुल रायपूरे , एम.डी लाळे आदिचे मोलाचे सहकार्य लाभले . प्रकाश बन्सोड व विजय शेन्डे यांचा भिमगिताचा कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमा नंतर शेडयुल्स कॉस्ट फेडरेशन तर्फे भोजनादान करण्यात आले.