
चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधि
समर्थ महाविद्यालय लाखनी येथे आज दि 1 जानेवारी 2025 ला वाचन कौशल्य या विषयावर ग्रंथालय विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिगंबर कापसे होते.प्रमुख वक्ते प्रा. डॉ. धनंजय गभणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व , वाचनाची वेळ, वाचन पद्धती काय वाचावे कसे वाचावे , वाचन कौशल्य कसे आत्मसात करावे या बद्दल सखोल व विस्तृत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास पुरते वाचन सीमित न ठेवता संदर्भ ग्रंथ ,नियत कलिके वर्तमानपत्रे यांचे हि नियमित वाचन करावे.यामुळे विचार शक्ती आकलन शक्ती वाढण्यास मदत होते. उत्तम साहित्य वाचन केल्यामुळे मन व चित्त शुद्ध होऊन त्यामुळे लेखन करणे सोपे होते. जो वाचतो तोच उत्तम बोलू व लिहू शकतो हे प्रा. गभणें यांनी सोदाहरण विद्यार्थ्याना आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले.
प्रत्येकाने वर्ष भरात किमान पाच उत्तम ग्रंथाचे वाचन करावे व त्याची सुरुवात आज पासूनच करावी असे आवाहन केले.प्राचार्य डॉ.कापसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून वाचनाचे महत्व समजावून दिले.
विद्यार्थ्यांनी वाचनाची कास धरावी , दिवसामाजी काही तरी वाचावे ,मोबाईल चा आवश्कतेनुसार वापर करावा , अवांतर वाचनावर भर द्यावा असे आवाहन केले. या कार्यशाळेला विद्यार्थी ,प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. कु. भुसारी हिने आभार प्रदर्शन केले.