लोकमान्य ज्ञानपीठात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        भद्रावती येथील लोकसेवा मंडळातर्फे संचालित लोकमान्य ज्ञानपीठ येथे शाळा स्तरावर भव्य विज्ञान प्रदर्शनीचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

      या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी आपापल्या विज्ञान प्रतिकृती सादर करीत आपल्या कल्पकतेची चुनूक दाखवली.तसेच प्रेक्षकांना प्रतिकृतीबद्दल सविस्तर माहिती समजावून सांगितली.

        या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते करण्यात आले. 

        याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे सचिव नामदेवराव कोल्हे,सहसचिव अमित गुंडावार,सदस्य उल्हास भास्करवार,उमाकांत गुंडावार,गोपाळराव ठेंगणे,लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन सरपटवार,लोकमान्य ज्ञानपीठाच्या मुख्याध्यापिका पूनम ठावरी उपस्थित होते.या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

        विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षक म्हणून लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.डॉ.आशिष आकोजवार व प्रा.पवन गौरकार यांनी काम पाहिले.