
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या भारतातील पहली महिला शिक्षण प्रसारक, समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे अध्यक्ष दुर्योधन खोब्रागडे होते,तर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सचिव कन्निलाल ढोक, ग्रामपंचायत पळसगांवचे सरपंच सरीता गुरनुले,अनुसुचित जाती विभाग कार्याध्यक्ष चिमूर अरविंद रामटेके,आश्रम शाळेचे शिक्षक सतीश डेकाटे,शिवानी माध्यमिक विद्यालय पळसगांवचे मुख्याध्यापक प्रकाश चुन्नारकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे माजी अध्यक्ष प्रदिप गजभिये यांनी केले व त्यांनीच उपस्थित सर्वांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाला बौद्ध उपासक,उपासिका व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.